चीनचा तैवानला हवाई इशारा

तैपेई – तैवानमधील हवाई प्रात्यक्षिकांसाठी चीनने आपल्या 18 लढाऊ विमनांचा ताफा पाठवून दिला आहे. अमेरिकेच्या दूतने तैवानच्या पदाधिकाऱ्यांसह बंद कक्षामध्ये चर्चा केल्याच्या पार्श्‍वभुमीवर चीनने तैवानला हा हवाई इशारा दिला आहे.

अमेरिकेचे आर्थिक, विकास, उर्जा आणि पर्यावरण खात्याचे उपमंत्री कीथ क्राच यांनी तैवानच्या आर्थिक खात्याचे मंत्री अणि उपपंतप्रधानांबरोबर बंद कक्षामध्ये चर्चा केली होती. क्राच यांनी तैवानमधील उद्योग नेत्यांशी उपहारोत्तर चर्चा केली होती. तसेच आणि अध्यक्षा त्साइ इंगवेन यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली होती. क्राच यांच्या भेटीवर चीनच्य पीपल्स लिबरेशन आर्मीने जोरदार टीक केली होती.

तैवानच्या खाडीजवळ चीनने लढाऊ विमानांचा युद्धसराव आयोजित केला आणि आपली लढाऊ विमाने त्यासाठी पाठवून दिली आहेत. 16 विमानांनी तैवानची हवाई हद्द ओलांडून हा युद्धसराव केला. त्यामुळे चीनच्या कुरापतखोरीवर तैवान आणि अमेरिकेनेही टीका केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.