चीनचा अमेरिकेला इशारा

बॅंकॉक: अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. चीनी लष्कराच्या प्रवक्‍त्याने आज बॅंकॉक मध्ये पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला. त्यांनी म्हटले आहे अमेरिकेच्या नौदलाने या भागात सातत्याने प्रक्षोभ निर्माण करणारी कृत्ये केली आहेत.

चीनचे लष्करी प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी सांगितले की अशियातील संरक्षण विषयक प्रतिनिधींच्या परिषदेमध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क ईस्पर यांनी चीनचे संरक्षण मंत्री जनरल वी फेंघे यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी आम्ही काही बाबी त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. त्यातून यापुढेही दोन्ही देशांच्या लष्करी पातळीवरील बैठका सुरूच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रात निर्माण झालेली तणावाची स्थिती कमी होण्यास मदत होईल असे सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.