चीनने करोना दडपण्याचा प्रयत्न केला – व्हायरोलॉजिस्टचा गौप्यस्फोट

हॉंगकॉंग – करोना विषाणूने आता जगभरात 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लागण झाली आहे आणि सर्व जगात या विषाणूचे थैमान सुरू असताना एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. या विषाणूच्य घातक स्वरूपाबाबत चीनला पूर्ण माहिती होती आणि हे भीषण सत्य दडपण्याचा प्रयत्न चीनच्या वरिष्ठ सरकारी पातळीवरून करण्यत आला, असा गौप्यस्फोट हॉंगकॉंगवरून अमेरिकेत पळून गेलेल्या एका विषाणूतज्ज्ञ महिलेने केला आहे. यामुळे या विषाणूच्या प्रादुर्भावाला चीनच जबाबदार आहे, या जगभरातील दाव्याला मोठे पाठबळच मिळाले आहे.

ली मेंग यांन असे या विषाणूतज्ज्ञ महिलेचे नाव आहे. हॉंगकॉंग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून त्यांना व्हायरोलॉजी आणि इम्युनोलॉजीचे विशेष शिक्षण घेतले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा या विषाणूचा प्रादुर्भाव दिसायला लागला तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या इंफ्लूएंझाच्या विशेष प्रयोगशाळेच्या माध्यमातून जगाला माहिती देणे हे चीनला शक्‍य होते. मात्र, या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या आपल्या निरीक्षकांनी आपल्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले. जर हे दुर्लक्ष केले गेले नसते तर अनेकांचा जीव वाचवणे शक्‍य झाले असते, असेही यांन यांनी म्हटले आहे.

“डब्लूएचओ’च्या रेफरन्स लॅबशी संबंधित असलेल्या विद्यापीठाचे निरीक्षक डॉ. लिओ पून यांनी यांग यांना डिसेंबर 2019 च्या अखेरीस चीनच्या मुख्य भूमीपासून बाहेर पडणाऱ्या विषाणूचा अभ्यास करण्यास सांगितले. मात्र चिनी सरकारने हॉंगकॉंगसह सर्व विदेशी तज्ज्ञांची मदत घेण्यास नकार दिला. यांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषाणूच्या स्वरूपाबाबत चर्चा केली. मात्र, या विषाणूबाबत खुली चर्चा करणाऱ्या संशोधक आणि डॉक्‍टरांना लवकरच ताब्यात घेतले गेले. त्यांना काहीही विचारू नये, अशी इतरांना ताकीदही दिली गेली.

आम्हाला काही विचारता येत नव्हते. पण आम्हाला मास्क वापरायला लागला. याच काळात चीनमध्ये मानवाकडून विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत होता. या सगळ्याला घाबरून यान यांनी लपतछपत 28 एप्रिलला अमेरिकेचे विमान पकडले. पकडले गेल्यास आपल्याला तुरुंगवास होईल, अशी त्यांना खात्री होती.

आपल्या पाठीमागे आपल्याला देशद्रोही, सायबर गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, हेदेखील यान यांना समजले आहे. हॉंगकॉंगमधील विद्यापीठाने यान यांचे वेब पेज डिलीटा केले. त्यांचा ई-मेलही बंद केला आहे. यान या विद्यापीठातील संशोधक रहिलेल्या नाहीत, असेही विद्यापीठाने स्पष्ट करून टाकले आहे.

हॉंगकॉंगमध्ये त्यांच्या पालकांची चौकशीही सुरू झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना परत येण्याची सूचना केली. मात्र ती सूचना यान यांनी मानली नाही. आपल्या कुटुंबीयांना पुन्हा भेटता येणार नाही, हे तथ्य त्यांनी स्वीकारले आहे. मात्र, करोनाबाबतचे तथ्य सर्वात आधी ज्यांना समजले, त्यामध्ये आपण असल्याने आपल्या जीवाला करोनापेक्षा चीनकडूनच अधिक धोका आहे, हे त्यांना समजून चुकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.