इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये विकास कामांसाठी तब्बल 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी चीनने केली आहे. पाकिस्तानमधील चीनच्या दूतांनी ही माहीती दिली. “वुमन्स चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्री’च्या कार्यक्रमात बोलताना चीनचे राजदूत यायो झिंग यांनी ही महीती दिली. चीन-पाकिस्तान आर्थिक कोरिडोर अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा वेग समाधानकारक असल्याचेही झिंग म्हणाले.
“सीपीईसी’ अंतर्गत ग्वादर बंदर चीनमधील शिन्झियांग प्रांताला जोडले जाणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी चीन पाकिस्तानमध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे, असे झिंग यांनी सांगितले.
चीन आणि पाकिस्तान दरम्यानच्या “फ्री ट्रेड ऍग्रीमेंट’च्या दुसऱ्या टप्प्यला ऑक्टोबरमध्ये निश्चिती मिळेल. त्यानंतर होणाऱ्या शेती उत्पादने, सागरी संपत्ती आदींसह पाकिस्तानची 90 टक्के निर्यातीवर चीनमध्ये शून्य टक्के कर लागू होईल. पाकिस्तानमधील वस्तूंना चीनमध्ये बाजार उपलब्ध होईल, असेही झिंग म्हणाले.