तैवानविरोधात लष्करी कारवाईची चीनची धमकी

दक्षिण चीन समुद्रावर चीनचाच हक्क असल्याचा दावा

सिंगापूर- दक्षिण चीन समुद्रावरील आपला हक्क अबाधित राखण्यासाठी चीनने आक्रमक पाऊल उचलले आहे. या समुद्रावर तैवानने हक्क सांगितल्याने भडकलेल्या चीनने तैवानविरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकीच दिली आहे. सिंगापूरमध्ये वार्षिक संरक्षण परिषदेमध्ये बोलताना जनरल वेई फेई फेंगे यांनी अमेरिकेला इशारा दिला नाही. मात्र अमेरिकेच्या कारवायांवरच त्यांच्या टीकेचा रोख होता. अमेरिकेने तैवानला पाठिंबा दिल्याने दक्षिण चीन समुद्रातील स्वैर वापराला प्रोत्साहन मिळत आहे. पण या समुद्रावर चीनचाच हक्क आहे असे जन. फेंग म्हणाले. चीनच्या पवित्र भूमीचा एक इंचही पीपल्स लिबरेशन आर्मी सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

तैवान हा चीनचाच भाग आहे, असे चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीने नेहमीच म्हटले आहे. तैवानवर चीनने नेहमीच आपला दबाव कायम ठेवला आहे. 70 वर्षांपूर्वी झालेल्या यादवी युद्धानंतर तैवानचा मुख्य भूमीशी संबंध तुटलेला आहे. तैवानमधील स्वातंत्र्याचा उठाव म्हणजे एकत्रीकरणासाठी शांततेने होत असलेले प्रयत्न आहेत, असे चीनने म्हटले आहे. यामध्ये त्रयस्थांचा हस्तक्षेपही चीनने नाकारला आहे.

“कोणालाही त्रास देण्याचा चीनचा उद्देश नाही. मात्र त्रास दिला गेल्यास त्याबाबत चीनला भीतीही वाटणार नाही. त्यामुळे कोणीही सीमारेषा ओलांडू नये. शत्रूला पराभूत करण्यासाठी चीनचे लष्कर बळाचा अवलंबही करू शकेल.’असे वेई म्हणाले.

अमेरिकेचे प्रभारी संरक्षण मंत्री पॅट्रीक शानाहान यांनी चीनवर दक्षिण चीन समुद्रात लष्करीकरण केल्याचा आरोप केला होता. तसेच दक्षिण चीन समुद्राचा वापर करण्याचा तैवानला अधिकार असल्याचेही म्हटले होते.

तैवानमध्ये 2016 मध्ये स्वातंत्र अध्यक्षांची निवड झाल्यापासून चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढला आहे. चीनने तेंव्हापासून तैवानशी संबंध तोडले आहेत. चिनी पर्यटकांनाही तेथे जाऊ दिले जात नाही. तैवानला चीनपासून तोडण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही किंमतीवर ताकदीचा अवलंब केला जाईल, असे वेई यांनी जोर देऊन सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.