चीनने केला जगातला सर्वात मोठा व्यापार ‘करार’

एकाचवेळी चौदा देशांना करून घेतले सहभागी

हनोई – चीनने आज जगातील सर्वात मोठा व्यापार करार करताना चौदा देशांबरोबर एक स्वतंत्र व्यापारी गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. रिजनल कॉम्प्रेहेन्सीव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप असे या गटाला नाव देण्यात आले आहे.

यात सहभागी झालेले बहुतांशी देश अशियातील आहेत. या करारासाठी गेली आठ वर्षे चर्चा आणि सल्लामसलती सुरू होत्या. त्याला आता अखेर आज अंतिम स्वरूप देण्यात आले. या संघटनेतील सहभागी देश एकमेकांशी खुला व्यापार करू शकणार आहेत त्यामुळे यातील सहभागी देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

या गटातून बाहेर राहण्याचा निर्णय भारताने या आधीच घेतला आहे. चीन सह जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड असे देशही यात सहभागी आहेत. या गटात भारतही लवकरच सहभागी होईल अशी आशा जपानचे पंतप्रधान योशिहिदे यांनी व्यक्त केली आहे. या नियोजित गटातील सदस्य देशांची एकत्रित लोकसंख्या सुमारे दोनशे कोटींपेक्षा अधिक आहे. संपुर्ण जगाच्या एक तृतीयांश एवढी ही लोकसंख्या मानली जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.