बीजिंग – चीनने प्रथमच सौर निरीक्षण उपग्रह अवकाशात सोडला आहे. उत्तरेकडील शांक्सी प्रांतातील तैयुयान सॅटेलाईट लॉंच सेंटरमधून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. लॉंग मार्च 2 डी रॉकेटच्या आधारे हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला आहे आणि तो आता अवकाश कक्षेमध्ये स्थिरस्थावर झाला आहे.
या रॉकेटमधून 10 लहानमोठे उपग्रह अंतरालात सोडण्यात आले आहेत. यामध्ये अंतराळातील हवामानाच्या दबावाची तपासणी करणाऱ्या उपग्रहाचाही समावेश आहे. याशिवाय हवानान निरीक्षण आणि पूर्वानुमानासाठीचा प्रायोगिक उपग्रहदेखील अंतराळात सोडण्यात आला आहे, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. लॉंग मार्च कॅरिअर या रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात सोडला गेलेला हा 391 वा उपग्रह आहे.