चीनने नोंदवला 18.3 टक्के विक्रमी विकासदर

बीजिंग  – करोना प्रादुभार्वाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने आर्िर्थक प्रगतीच्या बाबतीत पुन्हा वेग पकडला असून सन 2021 च्या वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपीचा आकडा 18.3 टक्‍के इतका झाला आहे. या कालावधीत चीनचे एकूण सकल घरेलु उत्पादन तब्बल 3.82 ट्रिलियन डॉलरइतके झाले आहे.

एखाद्या तिमाहीत इतक्‍या मोठ्या प्रमाणावर जीडीपी नोंद होण्याचा चीनच्या आर्थिक इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. सन 2021 या वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत चीनचे औद्योगिक उत्पादन कमालीचे सुधारले असून विक्री आणि गुंतवणूक क्षेत्रातही चीनने चांगली कामगिरी केली आहे. करोनाचा मोठा फटका या देशालाही सुरुवातीच्या काळात बसला होता पण त्यांचा जीडीपी याही काळात कधी शुन्याच्या खाली गेला नव्हता. त्यांचा सर्वात नीचांकी जीडीपी सन 2020 मध्ये 2.3 टक्‍के इतका नोंदवला गेला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनचा या आर्थिक वर्षातील विकासदर 8.4 टक्‍के इतका राहील, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाजही चीनच्या गेल्या दहा वर्षातील उच्चांकी कामगिरीचा असेल. तथापि चीनमध्ये उद्योग क्षेत्रातील संस्थांचे कर्जाचे प्रमाण खूप वाढले आहे त्याकडे चीनने लक्ष देण्याचा इशाराही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.