China Open 2024 (Malvika Bansod) :- भारताची धडाकेबाज शटलर मालविका बनसोडला चीन सुपर 1000 ओपन बँडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभूत व्हावे लागले. मालविकाच्या पराभवाने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
उपांत्यपूर्व लढतीमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीने मालविकाला सरळ सेटमध्ये 21-10, 21-16 असे पराभूत केले. अकाने यामागुचीने पहिल्याच सेटमध्ये मालविकाविरुद्ध १२-४ अशी मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर तिने पहिला सेट 21-10 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मालविकाने चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला दुसरा सेट देखील 21-16 असा गमवावा लागला.
END of Malvika Bansod’s brilliant campaign at prestigious China Open (Super 1000).
Malvika lost to 2-time World Champion Akane Yamaguchi 10-21, 16-21 in QF. #ChinaOpenSuper1000 pic.twitter.com/bhp7o1nVBO
— India_AllSports (@India_AllSports) September 20, 2024
पराभवापूर्वी मालविकाने या स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. दोन वेळेस राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमोरला पराभूत करताना मालविकाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
IPL 2025 : मेगा लिलावाच्या तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर..! जाणून घ्या,कधी आणि कुठे होऊ शकते आयोजन…
स्पर्धेत तिने पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया मारिस्काविरुद्धचा सामना देखील सहज जिंकला होता. मात्र उपांत्यपूर्व फेरीत तिला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभूत व्हावे लागले.