चीनचा जगाच्या व्यापारावर कब्जा 

मुंबई – कोरोना व्हायरसमुळे जग संकटात सापडले आहे. पण हा व्हायरस जिकडून आला तो चीन मात्र आता निश्‍चिंत दिसत आहे. एवढेच नाही तर चीनचे व्यापारी संपूर्ण जगातल्या कंपन्यांचे शेयर विकत घेत आहेत. जागतिक बाजारपेठेत चीन लपून छपून हे शेयर विकत घेत आहे. चीनची सगळ्यात मोठी कंपनी अलीबाबाची हॉंगकॉंग लिस्टिंगने 1.54 टक्के आणि टेनसेंटने 0.39 टक्के नफा एका आठवड्यात कमावला आहे, असं फोर्ब्समधले शेयर मार्केट तज्ज्ञ ब्रॅन्डन हर्न यांनी सांगितलं आहे.

एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या कंपन्या हॉंगकॉंगचा शेयर बाजार हेंग-सेंगच्या माध्यमातून बाजारात शेयर खरेदी करत आहे. या कारणामुळे हेंग-सेंगमध्ये 32 टक्‍क्‍यांची उसळी पाहायला मिळाली. ही वाढ मागच्या वर्षातल्या वाढीच्या दुप्पट आहे.

मागच्या आठवड्यात चीनचं स्टॉक एक्‍सचेंज शांघाई आणि शेनजेनने मागच्या वर्षातली सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

जागतिक शेयर बाजारात घसरण 
एकीकडे चीनमधल्या शेयर मार्केटची आगेकूच सुरू असताना जगातला व्यापार मात्र ठप्प झाला आहे. याचा परिणाम तिथल्या शेयर मार्केटवर होत आहे. चीन वगळता संपूर्ण आशिया खंडातल्या शेयर बाजारात 10 टक्‍क्‍यांची सरासरी घसरण झाली आहे, त्यामुळे जपान, कोरिया, मलेशिया आणि भारतात गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे.

जगाची ही परिस्थिती असताना चीन मात्र शेयर बाजारात प्रगती करत आहे. तेही अशावेळी जेव्हा चीनचं व्यापारी शहर असलेल्या वुहानचा कोरोनामुळे विध्वंस झाला आहे. कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून झाल्यावर हा व्हायरस जगाच्या देशांमध्ये पोहोचला. कोरोना व्हायरसचा मोठा धक्का लागल्यानंतरही चीनने त्यांच्याकडची परिस्थिती सामान्य असल्याचं सांगितलं आहे. चीनमधले उद्योग, बाजार, व्यवहार आणि शेयर मार्केट पुन्हा एकदा सामान्य परिस्थितीमध्ये आलं आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे संपूर्ण जगातल्या स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा चीनने घेतला. चीनने कंपन्यांचे शेयर कमी किंमतीमध्ये विकत घेतले. जगातल्या अनेक कंपन्यांचे मालकी हक्क चीनच्या हातात जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चीनने जगाच्या अर्थव्यवस्थेवर कब्जा मिळवण्यासाठी कोरोना व्हायरसचा हत्यार म्हणून वापर केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×