‘करोनाच्या संधीचा चीन फायदा घेतोय’

नवी दिल्ली – लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते.  या पार्श्वभूमीवर करोनाच्या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो, असे बीजिंगला वाटत असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने म्हंटले आहे.

पूर्व आशियाई आणि पॅसिफिक प्रकरणाचे सहाय्यक सचिव डेव्हिड स्टिलवेल यांनी म्हंटले कि, भारत चीन संघर्षावर अमेरिकेची नजर आहे. सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष नागरिकांचा जीव वाचविण्याकडे आहे. या काळाकडे बीजिंग एक संधी म्हणून पाहत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या गृह मंत्रालयानेदेखील शहीद भारतीय जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली होती. तसेच दोन्ही देशांनी सीमेवरून मागे हटण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.