लष्करी ताकदीत चीन जगात ‘बलशाली’, जाणून घ्या भारताची स्थिती

नवी दिल्ली, दि. 21 – चीनकडे जगातील सर्वात शक्तीशाली लष्कर असून त्याच्या जवळपास जाणारी लष्करी ताकद अमेरिकेकडे आहे. त्यानंतर भारताकडे संख्यात्मक लष्करी बळ असल्याचे संरक्षण वेबसाईट मिलिटरी डायरेक्‍टने सांगितले होते.

संरक्षणासाठी अंदाजपत्रक, सक्रीय आणि निष्क्रीय लष्करी कर्मचारी तसेच हवाई, सागरी, जमिनीवरील आणि आण्विक सामुग्रीसह एकूण लष्करी ताकदीचा इंडेक्‍स बनवण्यात आला आहे. तो रविवारी प्रकाशित करण्यात आला. आपल्या प्रचंड अंदाजपत्रकीय तरतुदींसह अमेरिका दुसऱ्या स्थानावर असून त्यांचे गुणांक 74 आहेत. तर रशिया 69 गुणांकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

भारत 61 गुणांकासह चौथ्या स्थानावर असून फ्रान्स 58 गुणांकासह पाचव्या स्थानावर आहे, इंग्लंड 43 गुणांकासह नवव्या स्थानी आहे. तर चीन 100 पैकी 82 गुणांक पटकावर सर्वोच्च लष्करी ताकदीचा देश बनला आहे.

लष्करासाठी अमेरिका 732 अब्ज अमेरिक डॉलर्स एवढा खर्च करते. त्या पाठोपाठ चीन 261 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि त्यानंतर भारत 71 अब्ज डॉलर्स एवढा खर्च करत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले अहो. चीन समुद्रातील युध्द जिंकू शकते. अमेरिका हवेतील तर रशिया भूमीवरील युध्दात सरस अल्याच निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अमेरिकेकडे लढाऊ विमनांची संख्या 14 हजार 141 आहे. रशियाकडे चार हजार 682 तर चिनकडे तीन हजार 587 लढाऊ विमाने आहेत. चीनकडे यध्दनौका 406 आहेत. रशियाकडे 278 आहेत अमेरिका किंवा भारताकडे 202 युध्द नौका असल्याचे त्यात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.