लेह – लडाख परिसरात सीमेवरील चीनी सैन्याच्या कुरापतीमुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागेल या हेतूने भारतानेही आपले सैन्य सीमेवर गेली दोन वर्ष सज्ज ठेवले आहे. चीनच्या कुरापतीमध्ये आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील गोगरा-हॉट स्प्रिंग्स येथील एलओसीवर कब्जा केला होता. परंतु चिनी सैन्य हे कब्जा केलेल्या स्थानापासून 3 किमी अंतरावर पाठीमागे परतले आहेत. ही एक विघटन प्रक्रिया असून या ठिकाणी येण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात आले.
याबाबत एका वृत्तवाहिनीने सॅटेलाइटमधून एका चित्राबाबत खुलासा केला आहे. यावर त्यांनी चिनी सैनिकांच्या हालचालींना लक्ष्य केले आहे. 12 ऑगस्ट, 2022चे छायाचित्रे पाहिल्यानंतर असे दिसून आले की, चिनी सैनिकांनी सीमा रेषेच्या जवळील एका भागात एक मोठी इमारत तयार करण्यात आली होती. ज्याठिकाणी भारतीय सैन्य तेथे तळ ठोकून बसायचे. हा परिसर संपूर्ण खोलदरीत आढळतो.
15 सप्टेंबरचे एक छायाचित्रे पाहिल्यानंतर असे दिसून आले की, चिनी सैनिकांनी या इमारतीला पाडले आहे. त्यानंतर ढिगाऱ्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे. याआधी देखील चीनच्या हॅकर्सनी सीमेवरील वीज केंद्रांच्या ग्रीडवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. उत्तर भारतात लडाख आणि परिसरातील वीज वितरण व्यवस्थेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चीनच्या हॅकर्सनी केला होता.