बीजिंग – आधुनिक आणि वेगवान मारा करणाऱ्या हत्यारांचा शोध लावण्यामध्ये चीन जगातआघाडीवर आहे सुपरसोनिक मिसाइल्स आणि इतर हत्यारांचा शोध लावणाऱ्या चीनने आता नुकतीच सर्वात जास्त वेगाने मारा करणाऱ्या बुलेटचा शोध लावला आहे या हाइपर्सोनिक बुलेटचा वेग प्रतिसेकंद चार किलोमीटर असून नेहमीच्या बुलेटच्या वेगापेक्षा हा वेग तब्बल दुप्पटपेक्षा जास्त आहे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीप्रमाणे चौकिंग या प्रांतातील आर्मी मेडिकल सेंटरमधील संशोधकांनी काही डुकरांवर या हाइपर्सोनिक बुलेटचा मारा केला आणि त्याचे निष्कर्ष काय असतील याचा अभ्यास केला.
साधारणपणे बुलेट जेव्हा शस्त्रातून फायर केल्या जातात तेव्हा त्याचा वेग प्रतिसेकंद एक किंवा दोन किलोमीटर असतो पण या सुपरसॉनिक बुलेटचा वेग प्रति सेकंद 4 किलोमीटर असल्याने जेव्हा ही बुलेट शरीरामध्ये घुसते तेव्हा त्या ठिकाणी मोठी जखम तयार होते आकाशातून पृथ्वीवर उल्का पडल्यावर ज्याप्रकारे विवर तयार होते तशाच प्रकारचा मोठा जखमेचा भाग ह्या बुलेटमुळे शरीरावर तयार होतो.
डुकरांवर या बुलेटचा प्रयोग करण्यात आला तेव्हा डुकरांचा मृत्यू लगेच झाला नाही पण त्यांना जी जखम झाली होती त्यामुळे त्यांच्या शरीराअंतर्गत सुद्धा अनेक ठिकाणी रक्तस्त्राव सुरू झाला आणि सहा तासानी डुकरांचा मृत्यू झाला पीपल्स लिबरेशन आर्मीने या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे अर्थात आत्तापर्यंत या बुलेटचे प्रक्षेपण यशस्वी झाले असले तरी या बुलेट मारा करु शकतील असे योग्य शस्त्र विकसित करण्याचे आव्हान आता संशोधकांना समोर आहे कारण जेव्हा ही गोळी बंदूक किंवा गनमधून बाहेर पडेल तेव्हा त्याचा मोठा दणका बसतो आहे हा दणका सहन करण्याची क्षमता शस्त्रांमध्ये असणे आवश्यक आहे त्यामुळे आगामी कालावधीमध्ये या हाइपर्सोनिक बुलेटला सूट होईल अशाप्रकारे शस्त्र विकसित केली जाणार आहेत