चीन अखेर नमले; जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य 

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनने आश्चर्यकारकरित्या एक पाऊल मागे घेत जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे नकाशात दाखविले आहे. बीजिंग येथे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह समिट सुरु असून यावेळी चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले. या नकाशामध्ये चीनने पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग दाखवला आहे.

तीन दिवसांच्या बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले. महत्वाचे म्हणजे भारताने सलग दुसऱ्यांदा या परिषदेवर बहिष्कार टाकूनही नकाशात भारत बीआयटीचा भाग दाखविण्यात आला. चीननंने उचललेल्या या पावलामुळे तज्ज्ञही अचंबित झाले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असलेले हजारो नकाशे नष्ट केले होते. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात चीनमधील चॅनेल सीजीटीएऩ टेलिव्हिजनने कराचीमधील चिनी दुतावासावर झालेल्या हल्ल्याचं वृत्त देताना पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीरही वेगळं दाखवलं होतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.