वॉशिंग्टन – करोना व्हायरस सध्या जगभरात थैमान घालत आहेत. यामुळे अमेरिका-चीन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. करोनाचा फैलाव संपूर्ण जगभरात होण्यापासून चीन रोखू शकत होता, असे वक्तव्य अमेरिका राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोल्ट होते.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, चीनला करोनाचा फैलाव करण्यासाठी जबाबदार ठरवणारी अनेक कारणे आहेत. आम्हाला वाटते करोनाचा फैलाव जेथून झाला तिथेच त्याला रोखता येणे शक्य होते. लगेच त्याला रोखत जगात फैलाव होण्यापासूनही थांबवता आले असते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, करोनाच्या प्रादुर्भावावरून अमेरिकेने चीनविरोधात आघाडी उघडली असून, करोनाचा उद्रेक चीनच्या वुहान शहरातून झाला आहे, हे सर्वांना लक्षात यावे, यासाठी सर्व देशांशी चर्चा करण्यात असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी स्पष्ट केले. तर, या महामारीच्या प्रादुर्भावाविषयी जगाची फसवणूक केल्याप्रकरणी चीनमधील कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरण्यात यावे, असे आवाहन करत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हॅले यांनी “ऑनलाईन याचिके’वरून कॉंग्रेसला कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.