लसीबाबत पुन्हा लपवाछपवी? चीनच्या तज्ञाचे ‘त्या’ विधानावरून घुमजाव

बीजिंग – जगातल्या काही देशांनी करोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. त्याच चीनचाही समावेश आहे. मात्र चीनची लस कमी परिणामकारक ठरत असल्याचे आढळून आले. खुद्द त्याच देशाच्या रोग निवारण केंद्राचे संचालक गाओ फू यांनीही असे विधान केले होते. मात्र आता त्यांनी त्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे.

शनिवारी गाओ यांनी चीनची लस कमी प्रभावशाली असल्याचे म्हटले होते. जगातल्या अन्य देशांच्या तज्ञांनीही चीनच्या लसीबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर गाओ यांच्या वक्तव्याने चीनमध्ये भूकंप झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर तेथील सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने गाओ यांची मुलाखत प्रसिध्द केली असून आपल्या विधानाचे आकलन करण्यात माध्यमे कमी पडली असा दावा त्यांनी केला आहे. 

जगातले सगळेच संशोधक लसींच्या उपयुक्ततेबाबत आपले मत मांडत आहेत. त्यावर आपणही आपली वैज्ञानिक भूमिका मांडली असल्याचे ते म्हणाले. पण त्याचा सार एवढाच होता की, लसींची परिणामकारकता वाढवली गेली पाहिजे व वेगवेगळ्या लसींचा उपयोग झाला पाहिजे असा होता. असे गाओ यांनी स्पष्ट केले. तसेच करोनाच्या विषाणूवर आणि लसींवर सातत्याने संशोधन करणे आवश्‍यक असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

करोना चीनमध्येच जन्माला आला. त्याचा प्रसार तेथूनच झाला. त्यावर चीनने लस तयार केली असली तरी लसीबाबत प्रचंड लपवाछपवी झाल्यानंतर त्याच देशाच्या महत्वाच्या व्यक्तीने लसीच्या उपयुक्ततेबाबत कबुली दिल्यामुळे चीनची खरेतर नाचक्की झाली होती. मात्र त्याच व्यक्तीने काही तासांत घुमजाव केल्यामुळे चीनचा दडपशाहीचा कारभारही पुन्हा नव्या स्वरूपात समोर आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.