अफगाणिस्तानातील वाटाघाटींबाबत चीनला चिंता

काबुल – तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार दरम्यान थेट वाटाघाटींना लवकरच दोहा इथे सुरुवात होणार आहेत. या चर्चेनंता अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत सहभागी होण्याचीही शक्‍यता आहे. 

या तालिबान सरकारवर पाकिस्तानातून नियंत्रण ठेवता येईल, म्हणून पाकिस्तानने या वाटाघाटींचे स्वागत केले आहे. मात्र तशा परिस्थितीबाबत चीनने चिंता व्यक्‍त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट पुन्हा सुरू झाली तर शिन्झियांग प्रांतातील दहशतवादी कारवाया पुन्हा वाढतील, अशी भीती चीनला वाटते आहे. याच भागातील उघ्युर मुस्लिमांवर चीनकडून जाचक निर्बंध लागू केले जात आहेत. 

शिन्झियंग प्रांताबाबतचे धोरण हे चीनच्या ‘लुक वेस्ट’ धोरणाला अनुसरून आहे. ‘बेल्ट ऍन्ड रोड इनिशियाटिव्ह’ आणि मध्य आशियाई देशांमधील प्रकल्प हे याच धोरणाला अनुसरून आहेत. उघ्युरांकडून सुरू असलेल्या जिहादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी चीनला अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट नको आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानातील अनेक दहशतवादी लपून बसले असल्याने अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट यावी, याचे पाकिस्तानने स्वागतच केले आहे, असे हबिबा अश्‍ना या लेखिकेने एक स्तंभलेखामध्ये म्हटले आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय सहकार्य वाढल्यास पाकिस्तानकडून जिहादी कारवायांना मदतच होईल आणि पर्यायाने ‘बेल्ट ऍन्ड रोड’ प्रकल्पामध्ये अडथळा निर्माण होईल, असे या लेखिकेचे निरीक्षण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.