कोरोनावर जपानचे औषध प्रभावी ठरल्याचा चीनचा दावा

Madhuvan

नवी दिल्ली : सध्या जगासमोर कोरोना व्हायरसने आव्हान निर्माण केले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धतीने कोरोना व्हायरसचा रुग्ण बरा होत असला तरी या व्हायरसवर अजून ठोस औषध सापडलेले नाही. मात्र जपानमधील ताप आणि सर्दीवरील एक औषध कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचे चीनच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.

जपानी कंपनीने बनवलेले फॅव्हीपीरावीर हे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरत आहे. वुहान आणि शेनझेन येथे 340 रुग्णांवर या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या असे हॅंग शिनमीन या चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हे औषध मोठ्या प्रमाणात सुरक्षित असून, उपचारामध्ये अत्यंत प्रभावी आहे असे हॅंग यांनी ही माहिती दिली.

शेनझेनमध्ये चार दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला हे औषध दिल्यानंतर त्यांचा कोरोना व्हायरसचा अहवाल निगेटिव्ह आला असे एनएचकेने म्हटले आहे. फॅव्हीपीरावीर दिलेल्या रुग्णांच्या फुप्फुसामध्ये 91 टक्के सुधारणा दिसून आली. ज्यांना हे औषध दिले नाही, त्यांच्यात 62 टक्के सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. फुजीफिल्म टोयामा केमिकलने हे औषध बनवले आहे. अमेरिकेतही करोना व्हायरसवरील लसीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.