बीजिंग – अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याचे नियोजन केलेल्या तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांना चीनने धमकी दिली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभापती केविन मॅक्कार्ती यांची भेट घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे चीनने म्हटले आहे.
ही भेट त्साई इंग वेन यांनी टाळावी यासाठी त्यांच्यावर उच्च पातळीवरून दबाव आणायला सुरुवात झाली आहे. तैवानमधील राजकीय उच्चाधिकाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे. तसेच तैवानच्या सागरी हद्दीजवळ जवळपास दररोजच चीनची लढाऊ विमाने घिरट्या गालायला लागली आहेत.
काही दिवसांपूर्वीच हुंडुरासने तैवानबरोबरचे संबंध तोडून टाकले आणि चीनशी संबंध प्रस्थापित केले आहेत. यामुळे तैवानच्या सार्वभौमत्वाला मान्यता देणारे केवळ 13 देश शिल्लक राहिले आहेत.
तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन 30 मार्च रोजी अमेरिकेला जाणार आहेत. त्यापूर्वी त्या ग्युटेमाला आणि बेलिझला जाणार आहेत. 5 एप्रिलला त्या लॉस एंजेलिसला जाणार आहेत. तेथे त्या मॅक्कार्थी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या या भेटीला तैवानबाबतच्या व्यवहारांचे चीनच्या मंत्रिमंडळाच्या प्रवक्त्या झहू फेन्गिलगान यांनी आक्षेप घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संसदेच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. त्यालाही चीनने असाच आक्षेप घेतला होता.