अशिया-पॅसिफिक मुक्त व्यापार गटात चीनलाही हवे आहे स्थान

बिजींग – सध्या 11 देशांचा जो अशिया-पॅसिफिक मुक्त व्यापार गट अस्तित्वात आहे, त्यात आपल्यालाही स्थान मिळावे अशी मागणी चीनने केली आहे. या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून न्युझिलंडकडे चीनने तसा अधिकृत अर्ज केला आहे. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांनी या गटाची स्थापना केली होती.

त्यावेळी त्यांनी चीनला यातून वगळले होते. ओबामा यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सन 2017 साली अमेरिकेचा या गटातील सहभाग काढून घेतला. तर विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी अजून या गटात पुन्हा सहभागी होण्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. आपसात मुक्त व्यापार करण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आला आहे.

या गटात कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रुनोई, चिली, जपान, मलेशिया, मेक्‍सिको, पेरू, सिंगापुर, आणि व्हिएतानम या देशांचा समावेश आहे. या संघटनेत सहभागी होण्याविषयी ब्रिटन प्रयत्नशील आहे. यात अमेरिका नाही याचा लाभ घेऊन चीन या संघटनेत घुसुन त्याचा लाभ घेण्याच्या तयारीत आहे.

सध्या भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांनी क्वाड ही जी संघटना स्थापन केली आहे तीचा प्रमुख उद्देश चीनच्या वाढत्या आक्रमकपणाला आळा घालणे हा आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीन आता या गटात सामील होण्याचा प्रयत्न करीत आहे असा निष्कर्ष काढला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.