मुंबई – बंगाली अभिनेत्री नुसरत जहॉंने मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर तिच्यावर प्रश्नांचा भडिमार व्हायला लागला आहे. तो प्रश्न म्हणजो “या मुलाचे वडील कोण?’ याचदरम्यान तिने आपल्या मुलाचे नावदेखील निश्चित केले आहे.
नुसरतने आपल्या मुलाचे नाव “ईशान’ असे ठेवले आहे. मात्र त्याचे स्पेलिंग “यिशान’ असे केले आहे. त्यावरूनही तिला ट्रोल केले जायला लागले आहे. ट्रोलर्सनी या नावाचा संबंध अभिनेता यश दासगुप्ताबरोबर जोडला आहे.
कारण यश दासगुप्ता नुसरत बरोबर हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ उपस्थित होता. नुसरतच्या डिलीव्हरीची बातमी सर्वात प्रथम त्यानेच ब्रेक केली होती. प्रेग्नंन्सीदरम्यानदेखील तो नेहमी नुसरतबरोबरच असायचा. नुसरत आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे.
लग्न तुर्कीत झाले होते. त्यामुळे ते भारतात ग्राह्य धरले जाऊ शकत नव्हते. हे तिने खूप पूर्वीच स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर ती निखील जैनबरोबर केवळ लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात होती. मात्र नुसरतला झालेला मुलगा आपला नाही, हे निखिल जैनने स्पष्ट केलेले आहे.