दुबई – तेलाच्या पैशाने अतिश्रीमंत झालेल्या आखातातील राजे आणि राजपुत्र यांच्या श्रीमंतीच्या कहाण्या जरी दररोज चर्चिल्या जात असल्या तरी अनेक वेळा अशा कहाण्यांना माणुसकीची प्रेमाची किनारही
आढळते.
दुबईचे राजपुत्र शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशिद यांच्याबाबतीतही अशीच एक घटना घडली असून त्याची खूपच चांगली चर्चा होत आहे काही दिवसांपूर्वी राजपुत्र मोहम्मद यांच्या अतिशय महागड्या आणि आलिशान अशा मर्सिडीज कारवर एका चिमणीने आपले घरटे तयार केले होते खरे तर आपल्या नोकर-चाकर यांना सांगून हे घरटे तोडून राजपुत्र मोहम्मद आपल्या कारचा वापर करू शकत होते परंतु त्यांनी तसे केले नाही उलट त्यांनी या घरट्याचे संरक्षण केले.
ज्या कारवर चिमणीने घरटे तयार केले होते त्या कारभोवती लाल दोरीचे कुंपण उभे करून त्या घरट्याला कोणीही त्रास देणार नाही अशी दक्षता घेतली या घरट्यामध्ये चिमणीने आपली अंडी घालून त्या अंड्यातून पिल्ले बाहेर होईपर्यंत राजपुत्राने या घरट्याची काळजी घेतली आणि नंतर या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओही सोशल माध्यमांवर शेअर केला
ही चिमणी आपल्या छोट्या पिल्लांना दाणे भरवत असतानाचा व्हिडीओ राजपुत्राने नुकताच शेअर केला असून या व्हिडिओला त्यांनी कधीकधी छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या ठरू शकतात असे कॅप्शन दिले आहे राजपुत्राने आपल्या पक्षांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे दर्शन दाखवून दिल्याने या व्हिडिओचे आणि राजपुत्राचे कौतुक केले आहे