सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात जोरदार पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले आणि तुफान पाऊस सुरु झाला. परंतु पवारांनी भर पावसातही सभा सुरुच ठेवली. यावेळी बोलताना पवारांनी साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडली.
लोकसभा मतदारासंघाच्या पोटनिवडणूकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि विधानसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार दिपक पवार यांच्या प्रचारार्थ आज साताऱ्यात सभा आयोजित करण्यात आली होती.