दहशतवादी संघटनांकडून लहान मुलांचा वापर; संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता

संयुक्त राष्ट्र: गेल्या काही काळापासून नक्षलवादी संघटना आणि दहशतवादी संघटनांमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या उद्देशाने लहान मुलांची भरती केली जात असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने एका निवेदनाद्वारे दिली आहे. या विषयी त्यांनी आपल्या निवेदनात यावर चिंता व्यक्त करताना अशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवणाऱ्या गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेर्रस यांनी मांडलेल्या एका अहवालानुसार गेल्या काही काळापासून काश्‍मिरमध्ये हिब्जुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबाचे काही अतिरेकी आणि नक्षलग्रस्त भागातील काही नक्षली घटक आपल्या दहशतवादी कारवायांना पुर्णत्वास नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांचा वापर करण्याची योजना आखत असून त्यासाठी त्यांनी लहान मुलांची भरती सुरू केली असल्याचेही त्यांनी या आपल्या निवेदनात सांगितले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपुर्वी 14 वर्षांच्या पाच मुलांना दहशतवादी गटांनी आपल्यात सामावून घेतल्याचा उल्लेखही त्यांनी या अहवालात केला आहे.

तसेच त्यांनी मांडलेल्या या अहवालात ते म्हणाले आहेत की, काश्‍मिरच्या खोऱ्यात सशस्त्र दल आणि दहशतवाद्यांमध्ये होत असलेल्या लढ्याचा या लहान मुलांच्या मनावर मोठा परिणाम होतो आहे. अशा चकमकींच्या वेळी मुलांना संरक्षण मिळावे यासाठी भारत सरकारने केलेल्या उपायांचेही गुटेर्रस यांनी स्वागत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.