बालसुधारगृहातील बालकांना कुटुंबीयांकडे पाठवणार

नवी दिल्ली, दि. 26 – देशातील बाल सुधार गृहातील बालकांना त्यांच्या कुटुंबीयांकडे परत पाठवण्याचा निर्णय राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतला आहे. या बाल सुधार गृहातील बालकांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित व्हायला लागल्याने हा निर्णय घेण्यात अला आहे.

देशभरात 2.56 लाख मुले अशा बाल सुधारगृहांमध्ये ठेवली गेली आहेत. त्यापैकी 72 टक्के म्हणजे 1.84 लाख बालके तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मिझोराम, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि मेघालय या आठ राज्यांमधील बाल सुधार गृहांमध्ये ठेवली गेली आहेत. या देखभालगृहांमध्ये राहणारी मुले शक्‍यतो 100 दिवसांच्या कालावधीत आपल्या कुटुंबात परत यावीत यासाठी आयोगाने या राज्यांचे जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. ज्या बालकांना कुटुंबीयांकडे पाठवणे शक्‍य नसेल, त्यांचा विचार दत्तकविधान करण्यासाठी केला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.