सरसंघचालकांच्या ताफ्यातील कारच्या धडकेत बालकाचा मृत्यू

जयपूर: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील एका कारने दिलेल्या धडकेत एका बालकाचा मृत्यू झाला. ती दुर्दैवी घटना बुधवारी राजस्थानमध्ये घडली.

एका कार्यक्रमावरून परतणाऱ्या भागवत यांच्या ताफ्यात आठ ते दहा कार होत्या. त्यातील एका कारची धडक दुचाकीला बसली. त्या अपघातात सहा वर्षीय मुलगा मृत्युमुखी पडला, तर त्याचे आजोबा जखमी झाले. जखमी व्यक्तीला उपचारासाठी स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुचाकीला धडक देणारी कार अद्याप जप्त करण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×