पिंपळे गुरव, (वार्ताहर) – एस. एस. पी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या चिखली येथील जी. आय. एस. व सीनियर सेकंडरी विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सरुवात सरस्वती पूजनाने झाली. या कार्यक्रमाला हिंदी विषय प्राध्यापक वर्षा राऊळ या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतील प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या गौरवास्पद कविता तथा नृत्य सादर केले. तसेच हिंदी भाषेचे महत्त्व विषद करणारी नाटिका सादर केली.
या कार्यक्रमासाठी हिंदी विषयाच्या प्रमुख अन्नू सिंग, आशा काटेकर, स्वाती सुतार, मेघना गायकवाड यांनी विशेष मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन एस. बी. पाटील, विश्वस्त गणेश पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक सुनील शेवाळे, जी. आय. एस. प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती गडद, पर्यवेक्षिका माधुरी येवले, प्री प्रायमरी पर्यवेक्षिका भाग्यलक्ष्मी हाके, क्रीडा पर्यवेक्षक विनोद जगदाळे व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.