मुंबई – सध्या सलमान खान आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. तेथूनच त्याने ३ गाणी देखील रिलीज केली आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या फार्महाऊसचे काही व्हिडीओ देखील शेयर केले आहेत.
नुकतंच सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये तो चिखलात माखलेला दिसत आहे. तो आपल्या फार्महाऊसमध्ये शेती करीत असल्याचे या फोटोतून दिसून येते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सलमानने “सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करा…” असं लिहिले आहे,
दरम्यान, सध्या हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याचे फॅन सलमानचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो डोंगराच्या हिरव्यागार शेतात फिरताना दिसला होता.
View this post on Instagram
Following the Legend…….. My Maalik @Beingsalmankhan #Salmankhan #Legend #Sheraa #Beingsheraa
मी instagram वरील कंमेंट वाचल्या आहेत. त्यात कौतुक कमी आणि टीका जास्त केल्या आहेत.