मुंबई – मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची तब्बल साडेसात लाखांचे पाणीबिल थकले असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ मुख्यमंत्रीच नाहीतर इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिलं थकली आहेत. माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली. यानुसार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये पाणी बिल थकलं आहे. तर इतर नेत्यांच्या पाणी बिलाची रक्कम एकत्र केली तर ती ८ कोटीच्या घरात जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिल थकलेलं असूनही मुंबई महापालिका कारवाई का करत नाही असा प्रश्न विचारला जातो आहे.
कुणाची किती थकबाकी ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्षा निवासस्थान
एकूण थकबाकी ७ लाख ४४ हजार, ९८१ रूपये
सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, देवगिरी निवासस्थान
थकबाकी- १ लाख ६१ हजार ५५ रुपये
विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री, सेवासदन निवासस्थान
थकबाकी- १ लाख ६१ हजार, ७१९ रुपये
पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थान
थकबाकी ३५ हजार ३३ रुपये
दिवाकर रावते, परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान
थकबाकी १ लाख ५ हजार ४८४ रुपये
सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान
थकबाकी २ लाख ४९ हजार २४३ रुपये
एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम, नंदनवन निवासस्थान
थकबाकी २ लाख २८ हजार ४२४ रुपये
चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री, जेतवन निवासस्थान
थकबाकी ६ लाख, १४ हजार ८५४ रुपये
महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री, मुक्तागिरी निवासस्थान
थकबाकी १ लाख ७३ हजार ४९७ रुपये
ज्ञानेश्वरी निवासस्थान
थकबाकी ५९ हजार ७७८ रुपये
सह्याद्री अतिथीगृह
थकबाकी १२ लाख, ४ हजार ३९० रूपये