मुंबई – मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना व्हॉटऍपवर धमकी देण्यात आली आहे. आपल्या मागण्या पुर्ण केल्या नाहीत तर तुमच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लाऊ अशी धमकी यात देण्यात आली असून नार्वेकरांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे.
त्यानुसार गुन्हा शाखेने हा संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. हा संदेश पाठवणारा इसम अज्ञात आहे. ज्या क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला आहे त्यात त्याची ओळख स्पष्ट झालेली नाही.
तसेच त्यांने यात नेमक्या काय मागण्या केल्या आहेत याचा उल्लेख मात्र नार्वेकरांनी केलेला नाही. पोलिसांना हा संदेश फॉर्वर्ड करण्यात आला आहे. संबंधीत इसमाने ईडी, सीबीआय बरोबरच एनआयए ही दहशतवाद्यांच्या विरोधात केंद्राकडून वापरली जाणारी यंत्रणाही तुमच्या विरोधात वापरली जाईल अशी धमकी नार्वेकरांना दिली आहे.