म्हसवड येथे आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

सातारा – विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराचा दणक्‍यात प्रारंभ झाला आहे. सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ म्हसवड येथे जाहीर सभा घेणार आहेत.

राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती असली तरी सातारा जिल्ह्यातील माण – खटाव मतदारसंघात या दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. भाजपा, रासप, रिपाई, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री म्हसवड येथील बाजारपटांगणावर गुरुवारी दुपारी दीड वाजता जाहीर सभा घेणार आहेत. माण- खटावच्या मैत्रीपूर्ण लढतीविषयी ते काय बोलणार याकडे दोन्ही तालुक्‍यांचे लक्ष लागले आहे.

आजच्या सभेतच मुख्यमंत्र्यांकडून माण खटावच्या राजकारणाला कलाटणी देणारी घोषणा होण्याची शक्‍यता असल्याने उत्कंठा ताणली आहे. आजच्या सभेला कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहितेपाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, दोन्ही तालुक्‍यांचे भाजपा, रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांतीचे तालुकाध्यक्ष आणि जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)