Chief Minister Yogi Adityanath । उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ‘फाळणी आपत्ती मेमोरियल डे’ निमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानबाबत मोठा दावा केला आहे. पाकिस्तान भारतात विलीन होईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. फाळणीच्या भयंकर दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेजारी देश पाकिस्तानबाबत मोठा दावा केला. याविषयी बोलताना त्यांनी ,’एकतर पाकिस्तान विलीन होईल किंवा तो नष्ट होईल.’ असे म्हटले आहे.
काँग्रेसला संधी मिळाली तेव्हा त्यांनी देशाचा गळा घोटला Chief Minister Yogi Adityanath ।
फाळणीच्या दु:खद घटनेबद्दल काँग्रेस कधीही माफी मागणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेसला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी देशाचा गळा घोटला. त्यांच्या पापांची कधीच क्षमा होऊ शकत नाही. बांगलादेशात 1947 मध्ये 22% हिंदू होते, आज फक्त 7% उरले आहेत. आपली सर्व सहानुभूती त्या हिंदूंसोबत असली पाहिजे. अखंड भारताचे स्वप्न हेच अशा घटनांवर उपाय ठरेल.
‘जगात कुठेही संकट आले तर..’ Chief Minister Yogi Adityanath ।
1947 मध्ये भारताच्या राजकीय नेतृत्वाची प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कोणतीही शक्ती ही अनैसर्गिक फाळणी घडवून आणू शकली नसती, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताचा नाश झाला. जेव्हा जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा त्यांनी देशाच्या खर्चावर राजकारण केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, 1947 मध्ये पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष तिरंगा फडकावून आनंदोत्सव साजरा करत असताना असंख्य लोकांना मातृभूमी सोडावी लागली. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 10 वर्षात भारताची प्रगती जगाला चकित करते. त्यामुळे जगात कुठेही संकट आले की जग भारताकडे बघते.”असेही त्यांनी विश्वासाने म्हटले.
हेही वाचा
TMC खासदार म्हणाले,’मला एक मुलगी आहे, मी डॉक्टरांच्या संपात सहभागी होणार…’