मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाबळेश्‍वरमध्ये स्वागत

महाबळेश्‍वर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सपत्नीक शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता तीन दिवसांच्या खासगी दौऱ्यासाठी वेण्णा धरणाच्या भिंतीवर खास तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन उभयंतांचे स्वागत केले. यावेळी आमदार मकरंद पाटील, आ. अजय चौधरी आ. भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री ठाकरे यांना पाहण्यासाठी वेण्णा लेक येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

निवडणुकीनंतर ठाकरे कुटुंब नेहमी महाबळेश्‍वर येथे विश्रांतीसाठी येतात. यावेळी राजकीय स्थितीमुळे त्यांना येता आले नव्हते. शिवसेनेचे आ. भास्कर जाधव यांच्या मुलीचे लग्न येथील एव्हरशाईन या तारांकित हॉटेलमध्ये आहे. या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब येथे विश्रांतीसाठी आले आहेत. वेण्णा धरणाच्या भिंतीवर खास हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. तेथे त्यांचे सपत्नीक आगमन झाले.

त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली. शंभूराज देसाई यांनी प्रथम त्यांचे स्वागत केले. वाई विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आ. मकरंद पाटील यांनीही त्यांचे स्वागत केले. आ. अजय चौधरी, आ. भास्कर जाघव, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापुरकर, बाळासाहेब भिलारे,
उपाध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, सभापती अंजना शिंदे, “मधुसागर’चे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड, राष्ट्‌वादी कॉग्रेसचे शहर प्रमुख दत्ताजी वाडकर, युवा शहर अध्यक्ष रोहित ढेबे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विजय नायडू, लीलाताई शिंदे, नगरसेविका विमल ओंबळे, उज्वला तोष्णीवाल, शारदा ढाणक, श्रध्दा रोकडे आदी मान्यवरांनीही ठाकरे यांचे स्वागत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.