मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयात कोरोना लस घेतली आहे. मुख्यमंत्र्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत भारत बायोटेकची को-वॅक्सिन लस घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री असे तीन जणांना लस देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his first shot of COVID vaccine today. pic.twitter.com/3JWlmvKpHL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2021
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मी कोरोना लस घेणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली. यानंतर त्यांना लस देण्यात आली. ही लस देण्यात आल्यानंतर त्यांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे.जे.रुग्णालयात लस घेतली.