मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले ‘महाजॉब्स पोर्टल’चे उदघाटन

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यातच राज्याची आर्थिक घडी व्ययस्थित बसवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाजॉब्स पोर्टलचे उदघाटन केले आहे. उद्योजक आणि अकुशल, अर्ध-कुशल, कुशल मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल असल्याचे वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.


राज्यात बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी हे पोर्टल काम करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. महाराष्ट्र, महाजॉब्स आपले सरकारदेखील महाविकास आघाडीचे सरकार आहे त्यामुळे हा महा फॅक्टर आहे त्यामुळे जे काही करू ते भव्यदिव्यच करू असा विश्वासदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच विकास म्हणजे जिथल्या तिथे रोजगार मिळाला पाहिजे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी हे पोर्टल त्या दृष्टीने काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

http://mahajobs.maharashtra.gov.in    यावर सर्व रोजगाराची माहिती यापुढे असणार असल्याचे सांगण्यात आले.  तसेच उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी हे पोर्टल मदत करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.