बारामतीची जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या निकालाची चिंता करावी- मुंडे

पुणे: मुख्यमंत्री बारामतीची जागा जिंकून येण्याची बात करत आहेत. बारामतीची जागा जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपाच्या नेत्यांनी पहिले नागपूरच्या निकालाची चिंता करावी. आपल्या सुप्रियाताईंना विजयी करून मुळशीकरांनी आपलं खणखणीत नाणं मुख्यमंत्र्यांना दाखवावं, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.ते बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मुळशी येथे बोलत होते.

मुंडे म्हणाले, बारामती लोकसभेच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मुळशी येथे सभा झाली. बारामतीकर खरंच भाग्यवान आहेत की अनेकदा उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मानित झालेल्या सुप्रियाताई या मतदारसंघास लाभल्या आहेत. या उमद्या नेतृत्वाचा प्रचार करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भाजपाच्या सर्वच नेत्यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी पवार साहेब आणि कुटुंबियांची इतकी धास्ती घेतली आहे की, वर्धा असो की औसा, कुठेही यांना बारामती, मावळ आणि माढाच दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.