नवी दिल्ली – तामिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी आज दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी हेही उपस्थित होते. तामिळनाडूत द्रमुक-कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्टॅलिन यांनी सोनिया गांधी यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या नेत्यांनी तामिळनाडूतील मंत्रिमंडळ रचनेविषयी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. यावेळी स्टॅलिन यांच्या पत्नी दुर्गावती स्टॅलिन याही उपस्थित होत्या. या भेटीनंतर ट्विटरवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, तामिळनाडू राज्याच्या व तेथील जनतेच्या समृद्धीसाठी आम्ही द्रमुकच्या साथीत कार्यरत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. स्टॅलिन यांनी कालच पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतली आहे.