मुख्यमंत्र्यांनी लालपरीनेच पंढरपूरला जावे – आचार्य तुषार भोसले

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानोबा-तुकोबांसह सर्व महान संत बसने वारीला जात असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र हेलिकाॅप्टर किंवा मर्सिडीज गाडीने जाणं हा संतपरंपरेच्या शिष्टाचाराचा अवमान होईल.

त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाण्यासाठी एक लालपरी द्यावी व मुख्यमंत्र्यांनी एसटी बसने पंढरपूरला जावे, असं भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांचा पांडुरंगाच्या गाभार्यात जीव गुदमरतो आणि मग ते महापूजा अर्धवट सोडून बाहेर पडतात, त्यापेक्षा त्यांनी घरीच थांबवं, असं देखील आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.