मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुखांना आंदोलनकर्त्या मुली भेटणार

राज्यमंत्री खोतकरांची शिष्टाईनंतर अन्नत्याग आंदोलन मागे

नगर  – “”आम्हाला येथून बाहेर पडायचे आहे. पोटात अन्न गेल्याशिवाय आम्ही येथून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे उपोषण सोडावे लागत आहे.” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा (ता. राहाता) येथील उपोषणकर्त्या मुलींनी लिंबूपाणी घेत “अन्नत्याग आंदोलन’ मागे घेतले. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्या मुली दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्यावर्षी देशभर गाजलेल्या शेतकरी संपाची सुरूवात पुणतांबा (ता. राहाता) येथून झाली. निकिता जाधव, पुनम जाधव, शुभांगी जाधव या शेतकऱ्यांच्या मुलींनी सरकारने त्यावेळी दिलेल्या अश्‍वासनाची पूर्तता करावी यासाठी 4 फेब्रुवारीपासून “अन्नत्याग अंदोलन’ सुरू केले होते. पहिले चार दिवस प्रशासनाने अंदोलनाची कोणाही दखल घेतली नाही. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चौथ्या दिवशी पुणतांबा येथे भेट देऊन उपोषण सोडण्याची केलेली विनंती असफल ठरली. गुरूवारी शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली, मात्र उपचार घेण्याला नकार दिला होता. शुक्रवारी गावकऱ्यांचा विरोध मोडून शुभांगीला उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र आज शनिवारी पहाटे पोलिसांनी गावकरी आणि उपोषणकर्त्या मुलींचा विरोध मोडून निकिता जाधव, पुनम जाधव यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी आंदोलक मुलींचा अप्रत्यक्षपणे ताबा घेतला होता. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ठिकाणी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था उभारली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यां व्यतिरीक्त त्यांना कोणाशीही बोलू दिले जात नव्हते. उपचार सुरू असल्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीला सोडले जात नव्हते. सकाळी पावणे बारा वाजता राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जिल्हा रुग्णालयात आंदोलक मुलींशी भेटण्यासाठी आले. अतिदक्षता विभागात तासभर चर्चा मुलींशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मुलींना तेथून बाहेर काढण्यात आले. उपोषण सोडत असल्याचे त्या मुलींनी यावेळी सांगितले. मात्र मुलींच्या चेहऱ्यावर तणाव होता. थकवा होता. आंदोलन मागे घेत असल्याचे सांगताना थकवा अधिकच स्पष्ट दिसत होता. राज्यमंत्री खोतकर यांनी आंदोलक मुलींशी बंद खोलीत झालेल्या चर्चावर बोलणे टाळले.

आंदोलक पोलिसांच्या नजरकैदेत

“अन्नत्याग आंदोलन’ करणाऱ्या मुलींना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यापासून त्या पोलिसांच्या नजरकैदेत होत्या. वातावरणही तसेच सांगत होते. अतिदक्षता विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी आणि ओळख पटवूनच सोडवण्यात येत होते. मुलींच्या पालकांभोवती देखील पोलिसांचे कडे होते. या मुलींना पालकांशिवाय इतर कोणाशीही बोलून दिले जात नव्हते. मुलींना भेटण्यासाठी येणाऱ्यांची माहिती आण्‌ अिोळख पोलीस करून त्याची नोंद घेत होते. जिल्हा रुग्णालयातील जागोजागी लोकांना अडवले जात होते. त्यामुळे रुग्णालयात अंतर्गत भाग देखील पोलिसांच्या कडकसुरक्षा व्यवस्थेमुळे छावणीत बदलला होता.

उपोषण करणाऱ्या मुलींच्या शरीरावर परिणाम होऊ लागले आहेत. वैद्याकीय अधिकाऱ्यांच्या उपचार आणि अहवालानंतर त्यांना तेथून हलवावे लागले. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मुलींच्या मागण्याबाबत दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यासोबत चर्चा घडवून आणू.

अर्जुन खोतकर
पशुसंवर्धन राज्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)