मुंबई – एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राची कामे करताना दिसून येतात. रात्र असो कि दिवस,कार्यकर्त्याला भेटणं असो वा एखादी महत्वाची मिटिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला जास्तीत जास्त वेळ कार्यासाठी देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एरवी आपल्या शब्दांनी विरोधकांना घायाळ करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानावर देखील जबरदस्त बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होते धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023 या स्पर्धेचं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मैदानात उतरून तुफान फटकेबाजी केली.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने या स्पर्धेचे ठाण्यात आयोजन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना बॅटिंग करण्याचा आग्रह केला. सर्वांच्या विनंतिला मान देत मुख्यमंत्र्यांनी देखील बॅट हातात घेतली. मुख्यमंत्र्यांचं एक वेगळं रूप यावेळी जमलेल्या खेळाडूंना पाहायला मिळाल. जोरदार बॅटिंग करत शिंदेंनी सर्वच चेंडू सीमापार लगावले. जमलेल्या खेळाडूंनी देखील मुख्यमंत्र्याच्या आतिषबाजीवर टाळ्यांचा वर्षाव केला.
ठाणे शहरातील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असून मुख्यमंत्री शिंदेंनी काल या स्पर्धेला हजेरी लावली. यावेलीव बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परदेशात कार्यक्रमासाठी रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानासह धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळाला देखील भेट दिल्याचे समजते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.