अबब! बाहुबलीच्या भूमिकेत चक्क ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री – पहा व्हिडिओ …

बाहुबली या चित्रपटाने अवघ्या भारताला भुरळ घातली. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत बाहुबलीने पहिला क्रमांक पटकाविला. कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे वैश्विक कोडे ठरले होते. सध्या मध्यप्रदेशात पुन्हा बाहुबली या चित्रपटाचे वारे फिरू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुका.

नोव्हेंबरमध्ये मध्यप्रदेश राज्यात निवडणुका होणार आहेत.  त्यामुळे तेथील राजकारणात स्पूफ व्हिडिओचे युद्धच सुरु झाले आहे.  मध्यप्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना बाहुबलीच्या भूमिकेत दाखवत असलेला एक स्पूफ व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये चौहान हे बाहुबलीप्रमाणे शिवलिंग उचलत आहेत आणि त्यावेळी काँग्रेसमधील बडे नेते त्यांच्याकडे आ वासून पाहत आहेत. त्याचबरोबर बलात्कार प्रश्न हात घालत देखील यात एक संवाद घेतला आहे ज्यात ते म्हणतात की, “बलात्कार होण्यावर पीडितांना  पैसे नसतात देत, त्यांना द्यायची असते शिक्षा.”

या स्पूफ व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी,  राहुल गांधी, सोनिया गांधी यांना देखील वेळोवेळी दाखवण्यात आले आहे. बाहुबली चित्रपटातील लोकप्रिय संवाद आणि साहसी दृश्यांचा या स्पूफ व्हिडिओमध्ये खुबीने उपयोग केला गेला आहे. त्यामुळे देखील हा  व्हिडिओ खूप लोकप्रिय होत आहे.

https://twitter.com/amarbansal241/status/1035402440080809984

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)