मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिन तथा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/0d6dBrxblG
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2020
यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता,प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल तसेच वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.