CM Fellowship 2026 : राज्यातील तरुणांसाठी प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री फेलोशिप 2026’ कार्यक्रमाची घोषणा केली असून यामधून निवड झालेल्या तरुणांना मंत्रालयात थेट काम करण्याची संधी मिळणार आहे. (CM Fellowship 2026) या फेलोशिपच्या माध्यमातून तरुण-तरुणींना राज्य शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी, निर्णय प्रक्रिया आणि प्रशासनाचे कामकाज जवळून पाहता येणार आहे. प्रशासनातील विविध घटकांचा समन्वय कसा साधला जातो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही संधी ठरणार आहे. 60 तरुणांना संधी, महिलांसाठी आरक्षण यंदा एकूण 60 फेलोंची निवड केली जाणार असून त्यापैकी एक-तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील. या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये नेतृत्वगुण, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी विकसित करणे हा आहे. (CM Fellowship 2026) पात्रता काय? कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुण आवश्यक) वयमर्यादा: 21 ते 26 वर्षे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव (इंटर्नशिप/आर्टिकलशिप/स्वयंरोजगार ग्राह्य) आकर्षक मानधन निवड झालेल्या फेलोंना शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष दर्जा देण्यात येणार आहे. तसेच दरमहा 61,500 रुपये मानधन दिले जाणार आहे. फेलोशिपचा कालावधी 12 महिन्यांचा असेल. IIT मुंबईसोबत विशेष अभ्यासक्रम या कार्यक्रमांतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या सहकार्याने सार्वजनिक धोरण विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमही राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील तरुणांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यातून भविष्यात सक्षम, जबाबदार आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व घडण्यास मदत होणार आहे. (CM Fellowship 2026)