मुंबई – मुख्यामंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अद्यापही कोंडी कायम असून दोन्ही पक्षांकडून सातत्याने दावे-प्रतिदावे केले जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच या विधानाचा पुनर्रच्चार केला तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या रूपात शिवसैनिकच मुख्यामंत्री होणार असल्याचे प्रतिपादन केले.
Sudhir Mungantiwar,BJP: We want to run a strong and stable government, we wish to form the Govt with Shiv Sena. Uddhav ji had himself said earlier that Devendra Fadnavis ji is also a Shiv Sainik. #Maharashtra pic.twitter.com/cRgVJrdlX6
— ANI (@ANI) November 7, 2019
शिवसेना आमच्या सोबत आली नाहीतर आम्ही अल्पमतातलं सरकार स्थापन करु, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही. आम्हाला शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार स्थापन करायचे आहे, त्यासाठी शिवसेनेसोबत काही स्तरांवर चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar,BJP on being asked if BJP will stake claim to form a minority government: As of now we have no such plan. #Maharashtra pic.twitter.com/EvpPOQtrbX
— ANI (@ANI) November 7, 2019
तसेच राजकीय कोंडी फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हस्तक्षेप करणार असल्याची चर्चां सुरु होती. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी या वृत्ताचे खंडन करत गडकरी साहेब कधीच राज्याच्या राजकारणात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत कधीही राजकारणात सक्रिय सहभाग घेत नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.