अलिबाग : चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.19 मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व बुद्धवंदनेत सहभागी झाले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
#रायगड जिल्ह्यातील #महाड येथे महामानव भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांनी केलेल्या ‘चवदार तळे सत्याग्रहा’चे म्हणजेच क्रांती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले. #DrBabasahebAmbedkar #Raigad #Mahad pic.twitter.com/lRL5ZyyD0e
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 19, 2023
यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, बार्टी चे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहायक आयुक्त सुनील जाधव, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतीला 24 तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री विजयकुमार गावित
यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.