Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी दौरा केला आहे. विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचे दर्शन घेतले आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यापूर्वी बंडेखोरीवेळी येथे दर्शन घेतले होते. त्यानंतर राज्यामध्ये येऊन भाजपाच्या साथीने त्यांनी सरकार स्थापन केले.
यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्ता स्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटी जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. Eknath Shinde |
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde says, ” We are here for the darshan of ‘Maa Kamakhya’…this is the first list (of candidates for Maharashtra Assembly election), next 2nd list will come…we will contest the elections and Mahayuti will win…” https://t.co/gatwoCIwdK pic.twitter.com/fSay8BqptW
— ANI (@ANI) October 22, 2024
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार त्यापूर्वी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन त्यांनी कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादीही लवकरच जाहीर होईल. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचाविजय निश्चित आहे,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Eknath Shinde |
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने मंगळवारी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री आणि काही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.