CM Eknath Shinde | राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. त्याअनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बंड केले होते. तेव्हा त्यांनी सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीचा दौरा केला होता. यावेळी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
गुवाहाटीचा दौरा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.
प्रचाराचे रणशिंग फुंकणार
आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रचाराचा नारळ कामाख्या देवीच्या मंदिरात फोडल्यानंतर ते राज्यात प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले. CM Eknath Shinde |
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “जर मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असतील तर चांगलेच आहे. कामाख्या देवीच्या आशीर्वादामुळे आमचा उठाव यशस्वी झाला. त्यामुळे कामाख्या देवीचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.” CM Eknath Shinde |
अमित शाह यांच्यासोबत जागा वाटपाबाबत चर्चा
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली. यात भाजपला १५० ते १५५, शिंदे गटाला ८० ते ८५ आणि अजित पवार गटाला ४५ ते ५० जागा सोडण्यात येईल, असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश ; दोन दहशतवाद्यांना ग्रेनेडसह घेतले ताब्यात