कोल्हापूर : कोल्हापूरमधून महायुतीने नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत 10 मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
कोणत्या घोषणा केल्या?
1) लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!
2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!
3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!
4) वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!
5) राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!
6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!
7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!
8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच ; महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!
9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!
10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!