रत्नागिरी(खेड) : आम्हाला गद्दार म्हणता मात्र आम्ही गद्दार नाही तर खुद्दार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या गोळीबार मैदानात जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. काहीच दिवसांपूर्वी याच मैदानात उद्धव ठाकरे यांचीही सभा झाली होती, त्यानंतर आता शिंदेंनी या मैदानातून ठाकरेंवर तोफ डागली आहे.
काश्मीरमधील 370 कलम मोदींनी हटवलं, ज्यांना राम मंदिराची उभारणी केली, ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यासोबत जाण्याची आमची भूमिका चुकीची कशी असा सवालही त्यांनी विचारला. हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे, शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही, आम्ही तुमच्यासारखं सत्तेसाठी मिंधे झालेलो नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गद्दारी आम्ही केली नाही तर मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी तुम्ही 2019 मध्ये केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी गद्दारी, खोके यांच्याशिवाय त्यांच्याकडे बोलण्यासाठी आता दुसरे शब्दच नाहीत. तेही शब्द ते फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी करत असल्याचा घणाघातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
India’s power consumption : देशात वीजेच्या वापरात 10 टक्क्यांनी वाढ
शिंदे पुढे म्हणाले की, ’20 आमदार भेटायला गेले तेव्हा तुम्ही ज्यांना जायचंय त्यांनी जा दरवाजे उघडे आहेत, असं म्हणालात. दरवाजे उघडे ठेवा सगळे जातील, शेवटी फक्त तुम्ही दोघं राहाल. हम दो हमारे दो. माझं कुटंब माझी जबाबदारी, एवढंच राहील. तुमच्यावर हीच वेळ येणार, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.